पुणे : – महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी २२ नोव्हेंबरपासून सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी केले आहे.
ऊस उत्पादक शेतक-यांची थकीत एफ आर पी त्यावरील १५ टक्के व्याज व अंतिम ऊस बिल देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत मग राज्यातील २१५ साखर कारखाने सुरू कसे केले याचे उत्तर द्या ? असा सवाल पवार यांनी केला आहे.
आंदोलनाबाबत माहिती देताना शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक फाळके यांनी सांगितले,
मागील पाच वर्षातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफ आर पी आर एस एफ किंवा अंतिम बिलाच्या संदर्भात एकही साखर कारखान्याने हिशोब दिलेला नसताना राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व न्यायिक भूमिका मांडत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी अनेक वेळा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय,भूमिका घेऊन साखर सम्राट व शासन प्रशासनातील अलीबाबा आणि चाळीस चोर यांच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे.
केंद्र सरकारचेच एफआरपीच्या संदर्भामध्ये २९५०/- रुपये प्रति टन सन २०२१-२२ च्या हंगामासाठी देण्याचे स्पष्ट आदेश असताना एकाही साखर कारखान्याने ते दिलेले नाहीत ! तर २२-२३ चे ऊस गाळप हंगामासाठी तीन हजार पन्नास रुपयाची केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी साखर कारखान्यांनी विनाकपात देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका जाहीर केलेली नाही! साखर कारखान्याने ३०५०/-रुपये विनाकपात एफ आर पी देण्याच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम त्यांची भूमिका जाहीर करावी यासाठी संघटनेचे विठ्ठल पवार राजे हे अहोरात्र लढत आहेत झटत आहेत.
एफआरपी तसेच अंतिम ऊस बिल देण्यासाठी साखर कारखान्याकडे पैसे नाहीत! मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त साहेब, मग राज्यातील २१५ साखर कारखाने सुरू कसे झाले… जर साखर कारखाने एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेणार नसतील तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने संपूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरून मोठमोठे साखर कारखानदारांची वाहने अडवूनआणि कारखाने बंद पाडुन दाखवू ही भूमिका संघटनेच्या वतीने विठ्ठल पवार राजे यांनी घेतलेली असून त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यावरती साखर कारखान्यांची ऊस भरून जाणारे ट्रॅक्टर अडवून त्यांना लेखी समज दिलेली आहे. शेतकऱ्यांची एफआरपी द्या अन्यथा ऊस तोडणी किंवा गाळप बंद करा. जर तुमच्याकडे साखर कारखाने चालविण्यासाठी पैसा असेल तर शेतकऱ्यांची एफ आर पी देण्यासाठी तुमचा पैसा गेला कुठे याचे उत्तर द्या. अशी ठाम भूमिका घेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे संसदीय कार्यमंत्री ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांची आजच त्यांनी पुण्यात माझ्या समक्ष भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तर महाराष्ट्र राज्यातील खाजगी साखर कारखानदारांनी सुमारे ७८०० कोटी रुपयांहून अधिकची एफ आर पी व एच एन टी घोटाळा करून कपात केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश द्या अशी मागणी पालकमंत्री व संशोधन कार्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा लुटलेला हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एफ आय आर दाखल करण्याचे आदेश द्या अन्यथा २२ नोव्हेंबर पासून पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग येथे निर्णायक सत्याग्रह आंदोलनाची भूमिका घेत ते राज्यभर आपली भूमिका मांडत शेतकऱ्यांच्या पाठिंबासाठी फिरत आहेत. २२ नोव्हेंबर पासून च्या निर्णायक सत्याग्रह आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत आपण सर्वांनी त्यांच्या आवाहनाला साथ देत आपल्या सर्वांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून २२ नोव्हेंबर पासून होणाऱ्या सत्याग्रह आंदोलनाला आपण आहात तिथून पाठिंबा देऊन संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन पत्र संबंधित त्या ठिकाणचे तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी पोलीस स्टेशन प्रांत किंवा कलेक्टर किंवा विभागीय अधिकारी यांचे कडे देऊन शासन प्रशासनापर्यंत पाठवावेत असे आवाहन शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक फाळके, हिरामण बांदल रवी पवार व महिला आघाडी उपाध्यक्ष कीर्ती पुजारी यांनी पत्रकात म्हटले आहे.
एफआरपी तसेच अंतिम ऊस बिल देण्यासाठी साखर कारखान्याकडे पैसे नाहीत! मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त साहेब, मग राज्यातील २१५ साखर कारखाने सुरू कसे झाले… म्हणून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २२ नोव्हेंबर पासून पुणे येथून सुरू होणाऱ्या सत्याग्रह आंदोलनाला आहे तिथून पाठिंबा देत संघटनेचे मागण्याचे निवेदन तहसीलदार कलेक्टर प्रांत पोलीस, रिजनल जाँईट डायरेक्टर शुगर यांना, मुख्य सचिव तथा अध्यक्ष ऊसदर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ३२ व संबंधित महसूल विभागातील सर्व अधिकारी आमदार, खासदार व मंत्री यांना देऊन त्याची पोच घ्यावी असे आवाहन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक फाळके हिरामण बांदल ,कीर्ती पुजारी ,मालती पाटील ,स्वातीताई कदम व रवी पवार यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628