चार डिसेंबर पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करावे….

यावर्षी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि सातत्याच्या पावसामुळे सर्व सामान्य शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे सर्वसामान्य शेतकरी कोलमडून गेला आहे पिक विमा कंपनीचे कर्मचारी सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन स्थळ पाहणी करून बरच दिवस झाले सर्व सामान्य शेतकऱ्यांना सरासरी 25% पीक विमा देऊ असे विमा कंपनीने आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले होते याबाबत अधिक सूचना शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे सर्व सामान्य शेतकऱ्यांना चार डिसेंबर पर्यंत त्यांच्या हक्काचे पीक विमा रक्कम त्यांच्या बँकेत खात्यात जमा करा वी अन्यथा 5 डिसेंबर रोजी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालय समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल परिणाम विमा कंपनी आणि प्रशासन जबाबदार राहील असे सांगण्यात आले आहे….
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर.