उस्मानाबाद-सचिन बिद्री
उस्मानाबाद- *नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना फेसबुक वरती शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या जागी थेट राजीव गांधी यांचा फोटो वापरला…काही वेळानंतर सदर पोस्ट दुरुस्त करण्यात आली पण फेसबुक युजर्सनी जुन्या पोस्ट चा स्क्रिनशॉट काढून सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसून येत आहेत, अश्या चुका होतातच का..?खासदार साहेबांचं फेसबुक अकौंट स्वतः खासदार न वापरता इतरच कुणी हँडल करत असेल..अश्या नानाविध चर्चा युवकांतुन रंगत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना फेसबुक वरती शेअर केलेल्या पोस्ट मध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या फोटो च्या जागी थेट काँग्रेस चे स्व.राजीव गांधी यांचा फोटो वापरला. मात्र, खासदार निंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती पोस्ट तात्काळ हटवन्यात आली आणि नंतर दाभोळकर यांचा फोटो शेअर करीत पोस्ट दुरुस्त करण्यात आली. मात्र, ओमराजे यांनी सुरुवातीला शेअर केलेल्या पोस्टचे अनेक स्क्रीन शॉट्स व्हायरल झाले असून, सोशल मिडिया वरती खासदार ओमाराजे यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, ओमराजे याचं फेसबुक अकाऊंट त्यांचे काही लोकं चालवत असल्याची कुजबुज नागरिकांतुन होताना दिसत आहे.
नेमकं काय केली होती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट???
विचारांची लढाई ही विचारांनीच लढायला पाहिजे हींसेपेक्षा विचार श्रेष्ठ असतो. अशा स्पष्ट मताचे विज्ञानवादी, सुधारणावादी, बुद्धिवादी, परिवर्तनवादी चळवळीचे प्रणेते, आपल्या साहित्यातून अंधश्रद्धा विरोधी चळवळीला समाजाभिमुख बनविणारे समाजसुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…! अशी पोस्ट ओमराजे निंबाळकर यांनी करत राजीव गांधी यांचा फोटो पोस्ट केला होता.
हीच ती फेसबुक पोस्ट
नंतर ओमराजे निंबाळकर यांनी बदललेली पोस्ट खालीलप्रमाणे ( दुरुस्त केलेली पोस्ट )