सचिन बिद्री : प्रतिनिधी
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसायधारक, अन्नपदार्थ साठविणारे गोदाम, हातगाडीवर चहा, नाश्ता, पाणीपुरी, भेळपुरी, फरसाण, फळे व भाजीपाला विक्रेते व इतर खाद्य अन्नपदार्थ विक्रेते, भाजी मंडईत असणारे विक्रेते आदींनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत विक्रेते(आडत दुकानदार), वखार महामंडळ, दूध संकलन केंद्र, घरोघरी दूध घालणारे विक्रेते, हातगाडीवर आईस्क्रीम व थंडपेय, पॉपकॉर्न, खवा, मावा विक्रेते, इतर सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना व नोंदणी करणे आवश्यक आहे. फॉसकॉस या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करून परवाना व नोंदणी प्राप्त करून घ्यावी, त्यासाठी सेतू किंवा सीएससी केंद्र यांची मदत घेतली जाऊ शकते, अथवा स्वत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
“फॉसकॉस या संकेतस्थळावर अगदी सहज रित्या ही नोंदणी होणार असून सदर नोंदणी बंधनकारक आहे,सर्व अन्न व्यवसायिकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी”- पी. एस.काकडे-अन् व औषध प्रशासन अधिकारी उस्मानाबाद