सचिन बिद्री, [प्रतिनिधी ]
उस्मानाबाद : येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आप-आपल्या पद्धतीने पक्षावाढीसाठी कार्यक्रम राबवित असताना उमर्ग्यात पहिल्यांदाच प्रहार पक्षाची बांधणीला सुरुवात झाली आहे.सुस्त प्रशासकीय यंत्रणेला त्रासलेले, सर्व दिव्यांग, निराधार, कामगार आणि शेतकरी बंधूचा कल प्रहार पक्षात होताना दिसून येत आहे तर बरेच काही पक्षातील पदाधिकारी आणि काही सत्ताधारी सदस्य प्रहार जनशक्ती पक्षात सामील होणार असल्याचे उमरगा प्रहार सेवक श्री सुरज आबाचाने यांनी माहिती दिली. रविवारी दि 29 ऑगस्ट रोजी उमरगा येथे आयोजित सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त युवकांनी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या कार्याने प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षात सामील व्हावे असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव(दादा) देशमुख आणि दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी आव्हान केले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांतील भ्रष्ट्राचाराच्या मुद्द्यावर मैदानात उतरणार का..?पाच वर्षे सलग केवळ भ्रष्टाचार/आर्थिक अपहार आणि सुस्त यंत्रणेला त्रासून गेलेली जनता नव्याने उभारणाऱ्या प्रहार च्या चळवळीतील नवीन चेहऱ्यावर विश्वास ठेवणार का..?हे तर काळच ठरविणार..!
राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात प्रहार शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष सयाजीराव(दादा) देशमुख,प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष श्री मयूर काकडे,जिल्हा उपाध्यक्ष राचय्या स्वामी,बाळासाहेब कसबे-जिल्हासंघटक, नवनाथ मोहिते-जिल्हाउपाध्यक्ष, बाळासाहेब पाटील, जमीर शेख-उस्मानाबाद शहराध्यक्ष,शशिकांत मुळे-तुळजापूर तालुकाध्यक्ष,नागनाथ पाटील-परांडा तालुका अध्यक्ष, चिवरीचे महंमद शेख, अणदूर चे अनिल महाबोले आदिसांह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.