जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- प्रा.सुरेश दाजी बिराजदार

सचिन बिद्री:उमरगा

उस्मानाबाद : उमरगा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ग्रामपंचायत,नगरपालीका ,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडनुकी संदर्भात महत्वाची बैठक तालुक्यातील बलसुर गावातील छ. शिवाजी महाविद्यालयात दि २७ रोजी जिल्हाध्यक्ष प्रा . सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश युवक सचिव दिग्विजय शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी,जिल्हा सचिव दत्ता इंगळे, ता . उपाध्यक्ष प्रताप तपसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .

बलसुर येथे संपन्न झालेल्या या बैठकीत जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे .विकासात्मक कामाच्या माध्यमातूनच भक्कम राष्ट्राची निर्मीती होते.जनता अराजकतेला आणि जुमलेबाजीला कंटाळली आहे . तुम्ही कामाला लागा जनता तुमच्या पाठीशी आहे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा बिराजदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले . या बैठकीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकी संदर्भात सर्व गट व गणातील गट,गनप्रमुख,पदाधिकारी , उपस्थित होते .

यावेळी तालुकाध्यक्ष संजय पवार , युवक तालुका अध्यक्ष शमशोद्दीन जमादार,युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार,उद्योग सेलचे जगदीश सुरवसे ,तालुका सचिव धीरज बेळंबकर , राजू माने, विष्णू भगत, मिर्झा बेग ,अभिजीत माडीवाले, विठ्ठलसिंह राजपूत ,खाजा मुजावर, कुमार थीटे, बालाजी साळुंखे ,नेताजी कवठे, संजय जाधव ,उमाकांत पाटील, ओम गायकवाड, प्रताप महाराज , मोहन शिंदे, विजय सगर , रंणजीत गायकवाड, बाळासाहेब बुंदगे, देविदास पावशेरे, माधव नांगरे, किशोर जाधव ,बालाजी पाटील , वाघंबर सरवदे, किसन कांबळे , नंदू जगदाळे ,दयानंद बिराजदार, भाग्यश्री रणदिवे ,रूपाली सोनकवडे, अभय पाटील, कमलाकर पाटील , दिलीप पवार , बाळु फरताळे,योगेश जाधव , ऋषी जाधव, विष्णू माने, अण्णाराव लामजणे, कलेश्वर जाधव ,आयुब पटेल, दादा पाटील , कृष्णा मदनसुरे, रणजीत भोसले, बालाजी बिराजदार, सुभाष गायकवाड,यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *