नांदेड : जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय अप्पा बेळगे यांची काॅग्रेस पक्षाने काॅग्रेसच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड केली त्या अनुषंगाने रविवारी दुपारी नायगाव येथे जंगी स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या .

नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत दोन वेळा निवडून येऊन संजय अप्पा बेळगे हे जिल्हा परिषदे मध्ये दोन वेळा सभापती म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करून गेल्या दहा वर्षा पासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे केली .चांगल्या कामाची ओळख म्हणून पक्षाने संजय बेळगे यांची काॅग्रेस पक्षाच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी निवड केली .

तालुका अध्यक्ष निवड झाली म्हणून माजी.आ.वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव येथील जनसंर्पक कार्यालयात चव्हाण मित्र मंडळ , नगर पंचायत , आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी मोहन पा.धुप्पेकर , हानंमतराव पा चव्हाण , श्रीनिवास पा चव्हाण , प्रा रवींद्र पा चव्हाण , संजय पा.शेळगावकर , मावळते तालुका अध्यक्ष संभाजी पा.भिलंवडे , बापुसाहेब पा.कौडगावकर , बाबूराव अडकीने जि.प.च्या .माजी सदस्या डॉ मीनाक्षीताई कागडे , बालाजी मद्देवाड , प्रा.मनोहर पवार , गजानन चौधरी, सय्यद इसाक नरसीकर ,माधव कंधारे , दत्ता पा.ईज्जतगावकर , सय्यद ईसाक भाई , बाबासाहेब शिदे ,सजय पा.चव्हाण , पांडुरंग पाटील चव्हाण ,नारायण जाधव,बालाजी शिदे, रवींद्र भालेराव ,दयानंद भालेराव, साईनाथ चन्नावार,माणिक चव्हाण आदीची उपस्थिती होती .मी प्रत्येक निवडणूकीत मी कार्यकर्ता म्हणून काम केलो ,या पुढेही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करेन . गेल्या दहा वर्षा पासून मी जिल्हा परिषदेचे मध्ये चांगल्या पध्दतीने केलो . राज्याचे माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आ.वसंतराव चव्हाण आ.अमरभाऊ राजुरकर यांनी टाकलेली जवाबदारी मी चांगल्या प्रकारे पार पडेल व नेत्यांच्या विश्र्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे मत सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संजय अप्पा बेळगे यांनी व्यक्त केले .अध्यक्षीय समारोप करताना माजी आ.वसंतराव चव्हाण म्हणाले की काॅग्रेस पक्ष मंजबुत करण्यासाठी आपन प्रयत्न केले पाहीजे येणा-यां काळात निवडणुकी होणार आहेत .राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद लाभला पक्षाची ध्ये धोरणे जनते पर्यंत पोहोचण्यासाठी आपण पुढील काळात काम करावे व पक्ष मजबूत करावे असे आवाहन मा.आ.वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *