अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी शिक्षकाविरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीस तात्काळ अटक
धर्माबाद शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात सदरील शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपींस तत्काळ अटक केली आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक कन्या शिक्षक म्हणून कर्तव्यावर असलेल्या सय्यद एजाज टेम्बुरनिकर या शिक्षकाने काल दिनांक 20 डिसेंबर रोजी सदरील अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या घरी जाऊन अश्लील व गैरकायदेशीर कृत्य केले सदरील प्रकारण पोलीस ठाण्यात पोहचताच घटनेचे गंभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुरण नंबर 278/2022 नुसार 354(अ) व कलम 8 ,9 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपी शिक्षकास तात्काळ अटक केली आहे. शिक्षकी पेशास काळिमा फासणारे कृत्य केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कते यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आहे.
शिक्षण या सारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिकडुन असे कृत्य घडल्यामुळे सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे.
चौकट…. उपरोक्त प्रकरणी आलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीस अटक करण्यात आली सोशल मीडियावर निरर्थक पोष्ट फिरत असुन अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये व अनावश्यक अफवा पसरविना-यांनी देखील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य किंवा पोस्ट करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे
प्रतिनिधी माधव हानमंते धर्माबाद नांदेड
