section and everything up until
* * @package Newsup */?> विजेचा शॉक लागून निगडे गावांतील चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यु. | Ntv News Marathi

महावितरण च्या भोंगळ कारभाराने दुर्देवी घटना

नसरापूर( प्रतिनिधी)

भोर तालुक्यातील पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग लगत असलेले निगडे या गावामध्ये विजेचा शॉक लागून चार शेतकरी यांचा जागीच मृत्यु झाला.अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात बापलेकांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे,महावितरणाचा भोंगळ व निष्क्रिय कारभारामुळे निष्पाप चार शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.घटना घडण्याच्या आधी सतत सहा वेळा लाईट गेली होती. असे तेथील शेतकरी बांधवांनी सांगितले होते ,विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल भोर , महावितरण चे कर्मचारी व अधिकारी व राजगड पोलीस स्टेशन नसरापूर व आरोग्य विभाग भोर व नसरापूर दाखल झाले .चार शेतकऱ्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच निगडे गावावरती व भोर तालुक्यावर शोककळा पसरली आहे,

भोर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ,लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी एकच गर्दी करत शोक व दुःख संवेदना हळहळ व्यक्त केली आहे,घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *