महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे यांची निवेदनाद्वारे मागणी
पुणे : जिल्हा दुध उत्पादक संघ ,कात्रज डेअरीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे यांनी महसूल व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत बोलताना भाजपाचे पुणे जिल्हा संघटन,सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे म्हणाले, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आणि अनियमितता असल्याच्या तक्रारी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याकडे प्राप्त झाल्या आहेत. खरं तर म्हणजे सहकार क्षेत्र हे भ्रष्टाचारमुक्त असले पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भावना आहे. तसेच ते सदृढ असले पाहिजे. आणि हे टिकणारे असले पाहिजे. कारण सहकार क्षेत्रावर अनेक शेतक-यांचे संसार अवलंबून असतात.
