पुणे : इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या प्रयत्नामुळे अखेर अंगणवाडी सेविकांना आपल्या कामाचा भत्ता मिळाला आहे.

सन 2019 मध्ये कॅश मोबाईल प्रशिक्षण देण्यात आले होते या प्रशिक्षण साठी अंगणवाडी सेविकांना भत्ता देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. 2020 ला पर्यवेक्षिका यांच्या खात्यावर भत्ता जमा होऊन देखील अंगणवाडी सेविकांना भत्ता पासून वंचित ठेवण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे अंगणवाडी सेविकांना भत्ता पासून वंचित राहावे लागले. अंगणवाडी सेविकांना मोबदला मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या मदतीने तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरासे तसेच प्रकल्प अधिकारी मेरगळ , पुणे जिल्हा उपाध्यक्ष पूनम ताई निंबाळकर तालुका सचिव तनया जाधव उपाध्यक्ष तुळस जाधव यांनी अंगणवाडी सेविकाना कामाचा मोबदला मिळून देण्यास मदत केली.

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *