मंगरुळपीर: केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणेनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा मंगरुळपीर येथील शिवसैनिकांनी खरपसून समाचार घेत राणेच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर जोडे मारून पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी केली.
आम्ही शिवसैनिक पक्षप्रमुखाबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, सत्तेची मस्ती चढलेल्या नारायण राणे नी स्वतःची लायकी विसरू नये अन्यथा आम्ही शिवसैनिक नारायण राणेला त्याची जागा दाखवून देऊ असा इशारा आंदोलनस्थळी शिवसेना पदाधिकार्यांनी दिला आहे.दि.२४ रोजी मंगरुळपीर शहरातील शिवसैनिकांनी नारायण राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला व नारायण राणेंच्या बेताल वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून शिवसैनिकांनी वाशिम येथे पोलीस ठाण्यात नारायण राणे विरोधात गुन्हा नोंद केला. यावेळी बहूसंख्य शिवसैनिकांची ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206