.

भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केला. त्याचे पडसाद वाशिम मध्ये उमटले आहेत. आधी नारायण राणे यांच्या विरोधात वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पाटणी चौकात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या विरोधात कोंबडी फेक आंदोलन केले. यावेळी कोंबडी चोराला अटक करा तसेच राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतितात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आंदोलकांना स्थानबद्ध केले.
प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206