यावल तालुक्यातील पिंपरूड गावात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

यावल तालुक्यातील पिंपरूड येथील बाळू अशोक सुरवाडे, वय ५०, हे आपल्या घरी असताना घरातील पत्री शेडमध्ये मृतावस्थेत आढळून आले. हा प्रकार कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ही घटना बुधवारी घडली असून, याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *