मंगरुळपीर :-राजपूत समाजाचा प्राचीन काळापासून साजरा करण्यात येणार भुजेरिया हा उत्सव यावर्षीसुद्धा पारंपरिक पद्धतीने स्थानिक बिरबलनाथ महाराज संस्थान येथे उत्साहात साजरा करण्यात आला.राजपूत समाजात हा उत्सव साजरा करतांना पळसाच्या पानाच्या द्रोणमध्ये गव्हाची पेरणी करून नऊ दिवस त्याची महीला पूजा करतात. याचप्रमाणे लेक वाचवा लेक शिकवा असा संदेश सुद्धा या कार्यक्रमातून देण्यात येत असून रक्षाबंधनाच्या दिवशी या भुजेरियाची पूजा अर्चना करून त्यासमोर बहीण भावाला ओवाळून राखी बांधून भुजेरियास सुद्धा राखी अर्पण केल्या जाते.व दुसऱ्या दिवशी भूजेरियाचे नदी किंवा विहीच्या स्वच्छ पाण्यात विसर्जन करण्यात येते.
अशा पद्धतीने हा ऊत्सव सर्व समाज बांधव एकत्रित येऊन साजरा करण्यात करतात.यावेळी समाजातील महिला,पुरुषांची आणि भुजरीया ऊत्सव समीतीच्या सदस्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *