भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यात आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने, महापौर शारदा खेडकर, विजय अग्रवाल, वैशालीताई पालीवाल, सुलभाताई दुतोंडे, हर्षद साबळे, मायाताई घुले, माधव मानकर, राजेश नागमोते, अंबादास उमाळे, ॲड. रूपाली काकडे, ॲड. देवाशिष काकड, आम्रपाली उपरवट, संजय गोटफोडे, विद्याधर काकड, योगेश गोतमारे, जयश्रीताई फुंडकर, वैशालीताई शेळके, पवन महल्ले, व्यंकट ढोरे, चंद्रकांत अंधारे, डॉ. अमित कावरे, सुदर्शन धोत्रे, उमेश पवार, परिमल कांबळे, श्रावण इंगळे आदींच्या नेतृत्वात १ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सेवा दूतच्या माध्यमातून कार्यक्रम होणार आहेत.
रुग्णालयांमध्ये सेवा, प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, आपला परिसर आपला अभिमान, लाभार्थी संवाद, भजन सत्संग, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्थानिक ग्रंथालयांमध्ये भेट, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींशी चर्चा, रेल्वे स्थानकावर सेवा आणि सहकार्य, स्वच्छता अभियान, श्रमदान, नशा मुक्ती महाराष्ट्र अभियान, सामाजिक संस्थांसोबत संवाद, सेवा शिबिर, विकसित भारत यात्रा, वृक्षारोपण व जलसंवर्धन, बूथ स्तरावर जनसंपर्क, मंडळ स्तरावर बैठक, मोर्चा बैठक, मन की बात कार्यक्रम, बूथ अध्यक्ष व बूथ प्रभारी यांची बैठक, क्रीडा स्पर्धा, स्वरक्षण प्रशिक्षण, जन सुनावणी शिबिर, सामूहिक संपर्क, सरकारी योजनेचा प्रचार प्रसार, डिजिटल समन्वय कार्यक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद, विवाह सोहळ्यामध्ये सेवा व सहकार्य, सामूहिक विवाह सोहळा, नवविवाहित दांपत्यांचे अभिनंदन व शुभेच्छा भेट असे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सेवा दूत माध्यमातून होणार आहेत.
कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने अकोला जिल्ह्यातील दोन लाख नागरिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील ७३२ गावांना संपर्क अभियान या अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या महिनाभरात राबविणार आहेत, अशी माहिती माधव मानकर यांनी दिली.
या अभियानांतर्गत सेवा दूत म्हणून जुने जाणते पदाधिकारी, वेगवेगळ्या पदावर कार्य करणारे संघटन क्षेत्रातील शरद गायकी, सुनील खराटे, सोपान गुडदे, सतीश मेटे, गजानन खंडाळकर, अनिल केंदळे, अविनाश कायबोले, संतोष देशमुख, दिलीप राम मिश्रा, विनोद जाधव हे कार्य करणार असून त्यांना संजय घोरपडे, ॲड. देवाशिष काकड, रूपाली काकडे, अंबादास उमाळे, डॉ. अमित कावरे हे सहकार्य करणार आहेत. तसेच अकोला जिल्ह्यातून बुलढाणा, खामगाव जिल्ह्यात संजय शर्मा, राजेश नागमोते, रमेश आप्पा खोबरे, अभिमन्यू नलकांडे हे आपली सेवा महिनाभर पक्षाला देणार आहेत आणि गावोगावी कार्यकर्त्यांची नागरिकांशी संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या समस्या, दुष्काळग्रस्त परिस्थिती तसेच नागरिकांच्या भावना संघटना आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत.
सेवा आणि कर्म, सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने अभियान राबविण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात यशस्वी होईल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
