चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालया तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चास येथेआडसूळ टेक्निकल कॅम्पस व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने१११ फूट तिरंगा रॅली दि. २६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचा समारोप श्री. नृसिंह विद्यालय चास येथे करण्यात आला. याप्रसंगी आडसूळ टेक्निकल कॅम्पस चे खजिनदार मा. श्री परमेश्वर आडसूळ, विद्यार्थी विभागाचे डीन प्रा. स्नेहिल गायकवाड, प्रा. सचिन भोंडवे, प्रा. सुनील पवळे, प्रा. शुभम भंडारे, प्रा. शरद पवार, श्री गोरक्ष जाधव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री. चेतन पाटील व श्री. ऋषीराज कारले , श्री. नृसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ. घोडके मॅडम , आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री. चेतन पाटील व विद्यार्थी विभागाचे डीन प्रा. स्नेहिल गायकवाड यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोण कोणते कार्य करते याची माहिती दिली. तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, खजिनदार मा. परमेश्वर आडसूळ, संचालक मा. कृष्णा आडसूळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील, उप प्राचार्य श्री. किशोर जाधव, विद्यार्थी विभागाचे डीन प्रा. स्नेहिल गायकवाड, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. हेमंत जाधव, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. गणेश शिरसाठ, एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.विश्वजित कांबळे , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. संकेत शिंदे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. पूजा साठे, डॉ.धन्यकुमार जैन यांनी शुभेच्छा दिल्या.