३८ गावांची तहान भागविणाऱ्या योजनेच्या निकृष्ट कामाची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाकडून दखल ! झालेल्या निकृष्ट कामाचे काय होणार ?
अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील ३८ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारीची बातमी Ntv न्युज मराठी या वृत्तवाहिनीवर प्रसारित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी या कामास भेटी देऊन संबंधित ठेकेदारास सुचना दिल्या आहेत पण निकृष्ट झालेल्या ६० कि.मी.कामाची चौकशी करुन हे काम पुन्हा करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत मंजुरी मिळालेल्या योजनेमध्ये तिसगाव,केशव शिंगवे,रुपेवाडी,सातवड,आडगाव,शिरापुर,जवखेडे खालसा,करडवाडी,कासार पिंपळगाव,पारेवाडी,कासारवाडी,कोल्हार,लोहसर,भोसे,करंजी,राघुहिवरे,मोहोज बु.,मोहोज खु. रेणुकावाडी,वैजुबाभुळगाव,डोंगरवाडी,धारवाडी,कडगाव,दगडवाडी,मांडवे,निबोंडी,शिराळ,चिचोंडी,त्रिभुवनवाडी,पवळवाडी,कौडगाव,देवराई,घाटशिरस,डमाळवाडी,खांडगाव,जोहारवाडी या ३८ गावांचा समावेश आहे.या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली.मात्र पाईप लाईनची खोली नियमाप्रमाणे नसल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची तक्रार प्रकाशित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची पहाणी करुन संबंधित ठेकेदारांना सुचना दिल्या.३१२ किलोमिटर लांबीच्या या योजनेचे आतापर्यंत रात्रंदिवस काम करुन ६० किलोमीटरचे निकृष्ट काम झाले होते. निकृष्ट झालेल्या पाईप लाईनचे काम पुन्हा उकरुन पुर्ण करण्याची मागणी या योजनेतील अनेक गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

आतापर्यंत या भागात कोट्यावधी रुपये खर्च करुन वांबोरी पाईप लाईन योजना तसेच मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजना झाल्या मात्र त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणुन झालेले काम पुन्हा उकरुन दुरुस्त करण्याची मागणी ॲड.संदिप अकोलकर,मच्छिंद्र अकोलकर,राजेंद्र अकोलकर,महादेव अकोलकर,विठ्ठल मुटकुळे,शंकर आठरे,बाळासाहेब मुखेकर,राहुल अकोलकर यांच्यासह अनेक गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.जल जीवन योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील ३८ गावांचा समावेश असलेल्या योजनेचे काम वेगाने चालू आहे.या योजनेच्या पाईप लाईन खोदाई बाबतच्या तक्रारींची आपण दखल घेऊन सुचना दिल्या असून झालेल्या कामाबाबत लवकरच निर्णय घेऊ असे प्रोजेक्ट मॅनेजर इजाज सय्यद यांनी सांगितले.तसेच ३८ गावांची तहान भागविणाऱ्या योजनेच्या निकृष्ट कामाची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने दखल घेऊन पुढील काम चांगले सुरू केले असले तरी मागील झालेले ६० किलोमीटरचे निकृष्ट कामाचे काय होणार…? हेच पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.
भिवसेन टेमकर
पाथर्डी,अहमदनगर
मो ९३७३४८९८५१.