अहमदनगर : सरकारी दाखले मिळण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे वाचावेत आणि हे दाखल त्यांना गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे शासन आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी गावागावात शिबिरे घेऊन दाखल्यांचे वाटप करणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या शिबिराच्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही लोकांना मदत करावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ही मोहीम राबविण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत.