दौंड प्रतिनिधी सुशांत जगताप
पुणे : खांमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी माननीय आयुक्त सो पी एम पी एम एल स्वारगेट पुणे यांना पत्र देण्यात आले आहे..
दौंड तालुक्यातील खांमगाव गावची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेनुसार 7458 एवढी आहे सध्याची लोकसंख्या सुमारे 14 हजार एवढी आहे. सहजपूर नांदूर खामगाव अंतर्गत खामगाव गावठाण तसेच गावांमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कामगार वृद्ध व इतर नागरिक कामानिमित्त पुणे शहर येथे प्रवास करतात तसेच पी एम पी एल ची बस सेवा खामगाव मध्ये उपलब्ध नसल्या कारणाने ग्रामस्थ विद्यार्थी व नागरीकांना दळणवळणासाठी नाहक मोठ्या प्रमाणात सगळ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पीएमपीएमएल बस सेवा स्वारगेट हडपसर ते खांमगाव गावठाण पर्यंत सुरू व्हावी व खांमगाव ते उरुळी कांचन पासून 14 किलोमीटर अंतर आहे गावचा वतीने देखील ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे तरी बस सेवा चालू झाली तर परिसरातील नागरिकांची गैरसोय व पीएमपीएमएल चे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल . यामागणीसाठी पुणे सोलापूर महामार्ग होणारी बससेवा स्वारगेट हडपसर ते खामगाव अंतर्गत गावठाण गाडी मोडी खांमगाव फाटा सुरू करण्यात यावी अशी विनंती माननीय आयुक्त सो ,पी एम पी एम एल स्वारगेट पुणे यांना पत्राद्वारे खांमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच योगेश मदने यांनी केली.