क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांच्या स्मारकाचे भुमीपुजन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
कम्युनिष्ठ विचारधारेच्या विचाराने प्रेरित होवुन क्रांतिविरांगणा इंदुताई विषमेते विरुध्द अखेरच्या श्वासापर्यत लढा देणार्या पत्री सरकारच्या भुमीतील एक लढवय्या होत्या असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते आम.अजितदादा पवार यांनि व्यक्त केले . ते कासेगांव (ता. वाळवा )येथिल श्रमिक मुक्ती दलाचे नेते डाँ . भारत पाटणकर यांच्या आई क्रांतिविरांगणा इंदुताई पाटणकर यांचे स्मारकाच्या भुमिपुजन प्रसंगी बोलत होते.
पवार पुढे म्हणाले या क्रातिसिहांच्या भुमितुनच इंग्रजांना पत्री सरकारने सळो की पळो करुन भारतास स्वातंत्र्य मिळवुन दीले आहे. सध्याचे सरका र महाराष्ट्राच्या सर्वागिंण विकासाच्या प्रश्नाकडे कानाडोळा करित असल्याचे कडवी टीका करित अर्थसंकल्पाच्या पुर्वी चा निधी 80टक्के खर्च न केल्याचेही सांगितले सरकार कसे ठिकवायचे यात मुख्यमंत्र्यासह सगळे रमणाम झालेले चे चित्र दिसत असल्याचेही टीका केली.
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आम. जयंतराव पाटील म्हणाले सध्याचे सरकार महागाई बेरोजगारी यासारख्या समस्या सोडविण्या एेवजी थोर महापुरुषांची बदनामी करित समाजाचे लक्ष विचलित करण्यात माहेर बनत आहेत . बेरोजगारी भेडसावत असताना समान नागरी कायदा प्रचार करित भडकाविण्याचे एक नविन षडयंत्र सुरु असल्याचेी भिती व्यक्त केली जनतेने वेळीच सावध व्हावे असा इशारा दिला.
