विधी,दिव्या आणि श्रीजा ठरल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
चंद्रपूर : नागपूर येथे पार पडलेल्या “इन्स्पिरेशन कप” द्वितीय आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धा 2023 मध्ये जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया ला संलग्नित “कराटे अँड फिटनेस क्लब मूल” च्या खेळाडूंचा सहभाग होता ज्यात खेळाडूंनी दमदार कामगिरी करत क्लब च्या नावे उत्तम निकाल दिला आहे.
स्पर्धेत वय आणि वजनगटात यशस्वी कुमिते (फाईट) आणि काता प्रकार मध्ये अनुक्रमे पदके घेतली आहे ज्यात यशस्वी येनुगवार हिने कांस्य आणि रजत पदक,श्रीजा सहारे सुवर्ण आणि रजत पदक,आहाना सहारे सुवर्ण आणि कांस्य,अनुष्का येरमे सुवर्ण आणि कांस्य पदक, दिग्वि रायपुरे सुवर्ण आणि रजत पदक,प्रेम नरड सुवर्ण आणि रजत पदक, श्लोक रायकंटीवार दोन्ही कांस्य पदक,फक्त कुमिते प्रकार मध्ये प्रीती भंडारे सुवर्ण पदक, गौतमी मूलचंदनी रजत पदक, स्वराज पिसाळ कांस्य पदक, फक्त काता प्रकार मध्ये मेहेर कुकडे रजत पदक आणि विहान चौधरी ने कांस्य पदक मिळविलेले आहे तर सक्षम राजूरवार आणि विराज पिसाळ यांनीही उत्तम खेळाचे प्रदर्शन केले मात्र त्यांना यावेळी पदकाला मुकावे लागले,स्पर्धेत अशे सहा सुवर्ण, सहा रजत आणि सात कांस्य पदक मिळून 19 पदके कराटे अँड फिटनेस क्लब मूल च्या खात्यात आलेले आहेत.
स्पर्धेचा आकर्षण असणाऱ्या चॅम्पियन ऑफ चॅम्पिअन्स (14 वर्षा आतील मुली) इव्हेंट मध्ये अवघ्या दहा वर्षाची श्रीजा सहारे प्रथम क्रमांक पटकाविला तर चॅम्पियन ऑफ चॅम्पिअन्स (14 वर्षा वरील मुली) मध्ये दिव्या नरड ने प्रथम आणि विधी कोटकोंडावार हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या तीन मुख्य ट्रॉफी मूल च्या खेळाडूंनी आपल्या नावावर केली.मागच्या महिन्यातच विधी आणि दिव्या ची नागपूर विभागीय शालेय कराटे स्पर्धा जिंकून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.दोघी त्यात मूल तालुक्यातून नागपूर विभागाचे नेतृत्व करणार आहेत.
वरील सर्व खेळाडूंच्या विजयाने स्वतः खेळाडू तसेच पालकवर्ग व शहरवासीयांमध्ये कराटे बद्दल उत्साह वाढत आहे.मूल तालुक्यात सर्वाधिक खेळाडू हे कराटे खेळाचे असून येणाऱ्या काळात ते आणखी वाढतील, मोठ्या स्तरावरचे खेळाडू बनतील ह्यासाठी त्यांना आम्ही गर्जेनुरूप उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊ शकत आहोत याबद्दल समाधान वाटते असे मत कराटे अँड फिटनेस क्लब मूल च्या संचालक प्रशिक्षक इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे.
सर्व विजयी खेळाडूंना जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय प्रमुख सेन्सेई विनय बोढे सर, क्लब चे मुख्य प्रशिक्षक इम्रान खान सर, निलेश गेडाम सर तसेच सहप्रशिक्षक साक्षी गुरनुले, अमान खान,सुमेध पेंदोर आणि साहिल खान यांचे मार्गर्शन लाभले आहे.
सतीश आकुलवार