नांदेड: एसटी व कंटेनर चा भीषण अपघात ९ प्रवासी जखमी
मुखेड प्रतिनिधी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुखेड होऊन चार किलोमीटरच्या अंतरावरील लातूर राज्य मार्ग रस्त्यावरील शिरूर दबडे पाटील च्या वळणावर मुखेड आगाराची एसटी व कंटेनरचा भीषण अपघात झाला यात एसटी बसमधील नऊ जण जखमी झाले असून त्यात दोन अति गंभीर जखमी झाले आहेत
मुखेड आगाराची बस क्रमांक एम एच 20 बी एल 22 28 हे मुखेड कडे येत होती तर लातूरच्या दिशेने ट्रक क्रमांक जी जे झिरो पाच बी एक्स 76 42 हे जात असताना मुखेड होऊन चार किलोमीटरच्या अंतरावरील राज्यमार्ग लातूर राज्य महामार्गावरील शिरूर दबडे पाठीच्या वळणावर दोघांचा भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की एसटी बसच्या समोरील केबिन अक्षरशा चक्का चूक झाला होता एसटी बसमधील प्रवासी बालाजी गणपतराव हाके वय 40 वर्ष राहणार मुखेड रामदास संभाजी कबीर वय 40 वर्षे राहणार शिकारा मीरा नागोराव पांढरे वय 36 वर्ष राहणार मुखेड देविदास राठोड वय 65 राहणार सकलुर प्रल्हाद रामराव इंगळे वय 32 रा शिकारा रघुनाथ संग्राम मस्कले वय 50 आरा मुखेड संग्राम मारुती मुंडे वय 45 रा सावरगाव वाडी पुष्पा देविदास बनसोडे वय 51 राहणार मुखेड विष्णुकांत राजाराम कोतापल्ली वय 30 मुखेड यांना उपचार करण्यासाठी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते यात दोन जण गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते

या अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर तहाडे, डॉक्टर नरेंद्र गादेकर यांनी उपचार केले दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन आगारप्रमुख रा.सू बोधे, सुशील पत्की, बजरंग कल्याणी, भगवान रोडगे ,बालाजी नगरे, उपसरपंच शिवाजी राठोड ,अँड. हाके,बालाजी शिंदे बिल्लाळीकर ,विठ्ठलराव घोगरे प्रताप कोल्हे नागेश लोखंडे, उल्हास ईमडे यांनी जखमींंना मदत केली.दरम्यान ही घटना घडताच मद्यप्राशन केलेल्या कंटेनर चालक फरार झाला होता