बाभूळगाव : वृत्तपत्र व वाहीनीच्या प्रतिनिधीच्या हक्कासाठी तसेच समाजउपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बाभूळगाव प्रेस क्लब स्थापना शनिवारी (ता.4) रोजी स्थानिक विश्राम गृहात आयोजित एका बैठकीत करण्यात आली. यामध्ये प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी आरीफ अली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी
प्रविण लांजेकर, सचिव पदी विक्रमजीत ब-हाणपुरे यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजू नवाडे हे होते. सर्व प्रथम संघटनेला नाव देणे, संघटनेचे उद्देश व कार्यपध्दती निश्चीत करणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून आरीफ अली, उपाध्यक्ष प्रवीण लांजेकर, सचिव विक्रमजीत ब-हाणपुरे,, कार्याध्यक्ष शहेजाद शेख, कोषाध्यक्ष सचीन पुरी, सल्लागार सदस्य नईम मुल्ला, राजु नवाडे, राजु फसाटे, सदस्यपदी रवि काळे, निलेश बाहे, मुस्तफा खान, सागर परडखे, कल्पक वाईकर, दिलीप भाकरे, अजय कोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी यांना सहकार्य करणे, समाजउपयोगी उपक्रम राबविणे, जनतेच्या समस्या सोडविण्यात मदत करणे, जनतेचे प्रश्न प्रभावीपणे शासन स्तरावर मांडणे आदि कामे संघटनेमार्फत करण्याचे ठरविण्यात आले.

प्रतिनिधी सरफराज पठाण
Ntv न्यूज मराठी बाभुळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *