एक वर्ष मुदत पूर्ण केलेल्या बाभूळगाव नगर पंचायतच्या विषय समितीची निवडणूक आज मंगळवारी ( ता .२१ ) रोजी स्थानिक नगर पंचायतच्या सभागृहात संपन्न झाली . यात चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली . या चारही जागा अविरोध झाल्या असून यात शिवसेनेच्या शबाना परविन नईम खान यांची बांधकाम सभापती पदी निवड झाली . शिवसेनेचे जाकीर खान अनवर खान पठान यांची शिक्षण सभापती पदी , कॉंग्रेसचे शे . कादर शे रहेमान यांची आरोग्य सभापती पदी तर काँग्रेसच्या मंजुश्री प्रदिप नंदुरकर यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी अविरोध निवड झाली . नगर पंचायतच्या सभागृहात निवडणूकीची प्रकिया यवतमाळ उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्शी यांच्या उपस्थितीत पार पाडल्या गेली . सुरूवातीला स्थायी समितीतील सदस्या संख्या ठरविण्यात आली , प्रत्येक विषय समिती सदस्य संख्या ठरविण्यात आली . उपाध्यक्षकडे पाणी पुरवठा समिती देण्यात आली . यात कॉंग्रेसचे नगर पंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप पाणी पुरवठा समिती पदी निवड झाली . स्थायी समिती नामनिर्देशित करण्यात आली . दुपारी ३ वाजता विषय समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली . यात प्रत्येक विषय समिती सभापतीपदासाठी एकच नामनिर्देशितपत्र आल्याने या समित्या अविरोध झाल्या आहे . निवडणूक प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यवतमाळ उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्शी , सहाय्यक निवडणूक अधिकारी नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर व न.प.चे कर्मचारी विनोद बोरकर , गौरव गोटफोडे , गजानन गोटफोडे यांनी काम पाहिले . नवनियुक्त विषय समिती सभापती यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी माजी सरपंच डॉ . रिकबचंद तातेड , माजी उपसरपंच शब्बीर खान , रमेश मोते , अंकुश सोयाम , नगर पंचायतच्या नगराध्यक्षा संगिता मालखुरे , उपाध्यक्ष श्याम जगताप , नगरसेविका मदिना परविन शब्बीर खान , शितल गौरव तातेड , रेणूका अंकुश सोयाम , मंदाकिनी मोते , अमर सिरसाट , अनिकेत पोहोकार , वृंदाताई पिसे , लताताई मनवर , चंद्रशेखर परचाके , सुरेश वर्मा , अनिकेत गावंडे , शे . अहेमद यांच्यासह मयुरे पिसे , प्रदिप नंदुरकर , आरीफ खान उपस्थिती होती .
प्रतिनिधी – सरफराज पठाण
Ntv न्यूज मराठी बाभुळगाव