शिक्षण स्पर्धा च्या गर्दीत जिल्हा परिषद शाळांनी आपला दर्जा टिकून ठेवला आहे, तसेच देश घडविण्यासाठी युवापिढीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे . ही युवापिढी शैक्षणिक कौशल्याने घडली आहे . उत्कृष्टशैक्षणिक अध्ययन अध्यापनाचे धडे हे जिल्हा परिषद शाळेतूनच मिळतात असे प्रतिपादर महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार प्रा . अशोक उईके यांनी केले आहे . काल शुक्रवारी ( ता . २४ ) रोजी स्थानिक जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळेत स्नेहसंमेलन्न कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून आमदार उईके बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष सतिश मानलवार , प्रमुख अतिथी म्हणून बाभूळगाव नगर पंचायतच्या नगराध्यक्षा संगिता मालखुरे , शिक्षण सभापती जाकीर खान , महिला व बालकल्याण सभापती मंजुश्री नंदुरकर , मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भुमकाळे , माजी सरपंच डॉ . रिकबचंद तातेड , सामाजिक कार्यकर्ता आभा परोपटे , नगरसेवक सुरेश वर्मा , अनिकेत पोहोकार , अमर सिरसाट , शेख अहेमद , अनिकेत गावंडे , नगरसेविका मदिना परविन शब्बीर खान , शितल गौरव तातेड , रेणूका अंकुश सोयाम अभय तातेड , सचिन इंगोले , प्रदिप नंदुरकर , अंकुश सोयाम , अक्षय राऊत , आरिफ अली , सचिन माटोडे , निखील तातेड , गोलू अलोणे , सोनु शर्मा , विनोद अर्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनल तातेड , उपाध्यक्ष नरेश सातपुते , अजमत मुल्ला , सतिश शेळके , संजय मडावी , वर्षा मोटोडे , स्वाती थोटे , प्रिती शेळके , तृप्ती गुंडारे , मिना वरखडे यांची उपस्थिती होती . प्रा.डॉ.उईके पुढे म्हणाले , विद्यार्थी दशेत असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक चांगले व्यासपिठ आहे . या व्यावसपिठाच्या माध्यमातून चिमूकल्यांच्या कलागुणांना चालना मिळते . जिल्हा परिषद शाळेत उच्च दर्जाचे कार्यक्रम माझ्या मतदार संघात होणे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे . शालेय परिसरात खिचडी शिजविण्यासाठी व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी भवन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन आमदार डॉ . अशोक उईके यांनी यावेळी दिले आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत भुराणे यांनी केले . प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक शशिकांत खडसे यांनी मानले .

प्रतिनिधी सरफराज पठाण
Ntv न्यूज मराठी,बाभूळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *