श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी शिरूरमध्ये बुधवारी साजरी करण्यात आली.
शिरूर शहर व शिरूर तालुका श्री समस्त सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्यास शिरूर ,हवेली तालुक्याचे आमदार ,ऍड. अशोक पवार यांनी उपस्थिती दर्शविली. ऍड. स्वप्निल माळवे यांनी यावेळी आमदार अशोक पवार यांचा सत्कार केला.
श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पादुकापूजन ,अभिषेक ,भक्तिसंगीत असे कार्यक्रम पार पडले.
श्री.दिगंबर मैड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ऍड.स्वप्निल माळवे, सचिन पाथरकर, सुजित मैड, दिपकशेठ घोडके, सचिन लोळगे, प्रविण महामुनी, कल्पेश वर्मा, सोमेश काळे, उमेश पंडित, शिवपसाद पाथरकर, महाबली मिसाळ, पोपट मिसाळ, श्रीकांत मैड,राजेंद्र लोळगे, श्रीहरी खोल्लम, डॉ. अतुल बेंद्रे उपस्थित होते.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे
