उमरगा प्रतिनिधी :गणित सुधार उपक्रम अंतर्गत अध्ययन संस्था मुंबई व प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने, गणित सुधार उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे गणित विषयातील विभाज्यता या घटकाचे ऑलिंपिक घेण्यात आले यातील यशस्वी शाळांना मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते ट्राॕफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते.
उपक्रमांतर्गत सर्वप्रथम मुलांची प्रि टेस्ट घेतली जाते, त्यानंतर शिक्षकांना ट्रेनिंग दिले जाते, ट्रेनिंग सोबतच शिक्षकांना अध्ययनासाठी आणि अध्यापनासाठी लागणारे साहित्य व विद्यार्थ्यांसाठी कृतिपुस्तिका सुद्धा अध्ययन संस्थेतर्फे सर्व शिक्षकांना देण्यात आले. जेव्हा हे शिक्षक आपापल्या शाळेत ट्रेनिंग घेतल्याप्रमाणे अध्ययन करतात त्या वेळेला त्या मुलांमध्ये किती फरक पडला आहे हे पाहण्यासाठी एक महिन्यानंतर पोस्ट टेस्ट घेतली जाते. त्या पोस्टमध्ये सर्वात जास्त गुण मिळविलेल्या प्रत्येक शाळेतून दहा-दहा विद्यार्थ्यांची केलेल्या निवड करण्यात आली आणि दि 1 मार्च रोजी जि. प. प्रशाला उमरगा या शाळेमध्ये या निवडलेल्या 20 शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांची सकाळी १०:०० ते ५:०० वाजेपर्यंत ऑलम्पिक घेण्यात आली. या ऑलिम्पिकमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोराळ येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागराळ व उत्तेजनार्थ पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळी येथील विद्यार्थ्यांनी पटकावला.
बक्षीस वितरण जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील मुख्याध्यापक श्री पद्माकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्ययन संस्थेतील उमरगा येथील प्रमुख सायली गावडे, त्याचबरोबर सहकारी अनुजा सावंत,रमेश कोकितकर ,उमेश, धनराज गाडेकर व शरद काळे या सगळ्यांनी मिळून हा उपक्रम पूर्णत्वास नेला.
