पुणे :-
माथाडी बोर्डाची पावती फाडावी लागेल असे सांगून एकूण ८०० रूपयांची खंडणी घेवून माथाडी बोर्डाची कोणत्याही प्रकारची सही शिक्का नसलेली बनावट व बोगस पावत्या दिल्याप्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमोल शिवाजी मलगुंडे ,प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा. ढोकसांगवी ता.शिरूर जि.पुणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून इम्प्तियाज मुस्ताक साह वय -३१ वर्षे रा.कानामाऊ पो.खुटहन जौनपूर उत्तरप्रदेश सध्या रा.कळंबोली खेडोपाडा नवी मुंबई या चालकाने याबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.के.मांडगे ,हेडक्लार्क विलास आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ६/०३/२०२३ रोजी १० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव एम आय डी सी मधील ढोकसांगवी गावचे हद्दीतील झामिल स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटबाहेर फिर्यादी इम्प्तियाज मुस्ताक साह व ड्रायव्हर मोहम्मद सुलतान वकील खान ट्रक क्रमांक बी एम ४४७१ व एम एस ४६ बी यू ३८६३ यामध्ये लोखंडी क्वाईल भरून जामीन स्टील इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये खाली करण्याकरिता आले असता अमोल शिवाजी मलगुंडे, प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा.ढोकसांगवी ता.शिरूर यांनी फिर्यादी इम्प्तियाज साह व ड्रायव्हर मोहम्मद सुलतान वकीलखान यांना आम्हाला कंपनीमध्ये गाडी खाली करण्यासाठी माथाडी बोर्डाची पावती फाडावी लागेल असे सांगून संगनमताने प्रत्येकी चारशे असे एकूण आठशे रूपयांची खंडणी घेवून जयमल्हार इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या नावाची माथाडी बोर्डाची कोणत्याही प्रकारची सही शिक्का नसलेली बनावट व बोगस पावत्या दिल्या. या मजकुराच्या फिर्यादीवरून भा. द. वि. कलम ३८४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलीसांनी सांगितले.
पी एस आय शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628
