पुणे :-
शिरूर बाजार समितीत नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस निवेदनात पाचंगे यांनी म्हटले आहे, शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होत आहे. कांदा बाजारभावाची सध्याची परिस्थिती फारच चिंताजनक आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक-यांसाठी लवकरात लवकर नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी
नाफेड कांदा केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.
नाफेड केंद्र लवकरात लवकर सुरू झाले नाही तर आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असा इशाराही भाजपा उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628
