पुणे : अंकिता पाटील ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती च्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त बारामती तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी महिलांचा सत्कार व व्याख्यान चे आयोजन ' करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
प्रशासकीय महिला अधिकारी आरटीओ हर्षदा खारतोडे, सीईओ माळेगाव स्मिता काळे, बारामती शहर पोलीस स्टेशन पी. एस. आय. संध्याराणी देशमुख, वनाधिकारी शुभांगी लोणकर, कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, निर्भया पथक पोलीस हवालदार अमृता भोईटे, राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू रेशमा पुणेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.प्रशासकीय क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांना अंकिता पाटील ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच महिलांनी आपल्या स्वकर्तुत्वाने स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. नारी फाउंडेशन अध्यक्षा मधुरा करदीकर यांचे "भारतीय महिला २.०" या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमासाठी टी. सी. कॉलेज चे विश्वस्थ राहुलशेठ वाघोलीकर, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, डी. वाय . एस. पी .बारामती गणेश इंगळे, ॲड. गोविंद देवकाते, टी.सी कॉलेजच्या उपप्राचार्य सौ.स्मिता गोसावी मॅडम व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे