पुणे :- शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ गवारे व पोपट गवारे यांनी आपल्या लाडक्या पंढरपुरी खिल्लारी चंद्रा गाईचा डोहाळे कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. या डोहाळ कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व पाहुणे मंडळींना देण्यात आले होते.ताशांचा गजर करीत या चंद्रा गाईचे सर्व महिलांनी औक्षण केले. विधिवत ओटीभरण,परिसरातील खंडोबा मंदिराजवळ महिलांनी विधीवत पद्धतीने तळी भरणे कार्यक्रम केला. सारिका गवारे, रेश्मा गवारे,ऐश्वर्या गवारे,तुळसाबाई वाळके, सरूबाई गवारे,शालनबाई गवारे,नूतन गवारे,रोहिणी गवारे,ललिता गवारे शीला गवारे,सुलोचना खेडेकर या महिलांनी औक्षण केले. पुरणपोळीच्या मिष्ठांन्नाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. एन टी व्ही न्यूज मराठी प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628