पुणेकरांच्या तळागाळात पोहोचलेला एक लोकनेता ,ऍड.धर्मेंद्र खांडरे यांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या दीड वर्षापासून ते रूग्णालयात दाखल होते. गेल्या काही महिन्यापासून त्यांना श्वसनाचा आजार जडला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गिरीश बापट यांचे पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात एकहाती वर्चस्व होते. ते मुळचे स्वयंसेवक होते. नगरसेवक ते खासदार अशी चढत्या क्रमाची कारकीर्द बापट यांची राहिली. १९९५ पासून ५ वेळा आमदार म्हणून ते कसब्यातून निवडून आले. २०१९ मध्ये खासदारपदी त्यांची निवड झाली. पुणे महानगरपालिकेत ते नगरसेवकही होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस, शिरूरचे माजी आमदार,स्व.बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ऍड . धर्मेंद्र खांडरे म्हणाले,पुणेकरांच्या तळागाळात पोहोचलेला एक लोकनेता, अनेकांशी संपर्क, प्रचंड कार्यकर्त्यांचा संचय,कधीही पराभूत न होणारा नेता अशी खासदार गिरीश बापट यांची ख्याती होती.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे