लातूर 18 एप्रिल
लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा वाढदिवस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

दि.१८ एप्रिल २०२३ रोजी मांजरा कारखाना येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच कारखाना परिसरात वावर असलेल्या वन्यजीवासाठी पिण्याचे पाण्याची सोय करून देण्यात आली. यासोबतच मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात आले. मांजरा परिवारातील साखर कारखान्यास योग्य मार्गदर्शन करून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सर्वसामान्यांच्या जिवनात क्रांती आणली त्यांच्या हातून समाजाची निरंतर सेवा घडावी यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, सर्व संचालक मंडळ व सर्व खाते प्रमुख कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529