नागपूर : (सत्यशील बूद्ध विहार खापरखेडा वार्ड क्रं ३ ) भारतीय बौद्ध महासभा शाखा खापरखेडा च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ या जयंती तसेच महाकारूणिक तथागत बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त सत्यशील बूद्ध विहार खापरखेडा येथे विविध सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १४ एप्रिल ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयती प्रित्यर्थ भव्य अशी मीरवणूक काढण्यात आली.तसेच दिनांक ५/५/२०२३ ला बूद्ध जयंती बूद्ध पौर्णिमा निमित्त शांती रैली क्यानडल मार्च चे सूध्दा आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भीमगीत बूद्धगीत,निंबू चम्मच,संगीत खूर्ची.व भव्य असे आंबेडकरी कवि सम्मेलन,तसेच दहा दिवसीय धम्म शीबिर सूध्दा घेण्यात आले. त्याचप्रमाणे बूद्ध गीत,भीम गीता वर आधारीत नृत्य योगेश डाँन्स ग्रुप तर्फे सादर करण्यात आला.भूपेन्द्र नागदेवे मार्फत रमाई नाटक प्रस्तृत करण्यात आले. ज्या स्पर्धाकांनी यामध्ये भाग घेतला व स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळवले त्यांना दिनांक ६/५/२०२३ ला भाऊसाहेब बोरकर व सत्यशील बूद्ध विहार कमेटी तर्फ बक्षिस वितरण करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती:-भाऊसाहेब बोरकर, मनोहर डोंगरे, शयाम गजभीऐ, नरेश पाणतावने ,प्रकाश नागदेवे, दिक्षम डोंगरे, बंडूभाऊ पाटील, राजेन्द्र मेश्राम, केवल मेन्ढे, भाऊराव बागडे, स्वप्नील खांडेकर, सूरेश दिघे, राजेश चव्हाण, प्रणिता डोंगरे, छाया पाणतावने, संगीता मेंढे,प्रभाताई गायकवाड, संगीत डोगरे, शोभा हूमणे,उषा मोहोड,संजीवनी मेश्राम, सूनंदाताई लोखंडे, किरण शेंडे व खापरखेडा नगरातील सर्व नगरवासी यांनी यामध्ये सहकार्य केले.
प्रतिनीधी विनोद गोडबोले खापरखेडा