पत्रपरिषदेत रिपाई नेते पृथ्वीराज बोरकर यांचा आरोप

अलीकडे खापरखेडा परिसरात नगर पंचायतच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे आमदार सुनील केदार यांनी दलित कार्ड खेळून पाच वर्षे सरपंच आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे सूतोवाच केले यासंदर्भात नगर पंचायत कृती समितीच्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी केदारांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी चेमरी बिल्डींग येथे १७ मे बुधवारला सायंकाळी पत्रपरिषदेचे आयोजन केले होते यावेळी रिपाई नेते पृथ्वीराज बोरकर यांनी आमदार सुनील केदार मागील अनेक वर्षांपासून राजकीय स्वार्थासाठी नगर पंचायतचा विरोध करीत असल्याचा आरोप केला त्यामूळे येणाऱ्या काळात सर्वपक्षीय राजकीय नेते विरुद्ध आमदार सुनील केदार सामना रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पत्रपरिषदेला पृथ्वीराज बोरकर, रमेश जैन, किशोर चौधरी, अशोक मेश्राम, प्रकाश लांजेवार, पृथ्वीराज बागडे, श्यामराव सरोदे, विलास महल्ले, राज तांडेकर, जयंत चव्हाण, राजेश गायकवाड, चंद्रशेखर पानतावणे, अनेस चवरे, नितीन गोस्वामी, रवी शेंडे, सुमेध चव्हाण, प्रशांत पाटील, राजकिरण शेंडे, मंगेश चोरपगार, अनिल छाणिकर, अनिल धनवटे आदि उपस्थित होते.

नुकत्याच खापरखेडा येथे झालेल्या आमदार सुनील केदार यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात आमदार सुनील केदार यांनी स्थानिक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका हरल्यामूळे नगर पंचायतचा मुद्दा उपस्थित केल्याचा घणाघात विरोधी पक्षावर केला शिवाय दलित महिला सरपंच असल्यामूळे पदावरून कमी करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता.

केदारांच्या आरोपावर उत्तर देतांना रिपाईनेते पृथ्वीराज बोरकर यांनी सांगितले की चिचोली ग्रामपंचायतला नगर पंचायत दर्जा मिळवून देण्याची मागणी जवळपास ३० वर्ष जुनी आहे यादरम्यान अनेक ठराव पारित करण्यात आलेत मात्र सदर ठराव नागपूर जिल्हा परिषदे पुढे सरकले नाहीत चिचोली ग्रामपंचायत नगर पंचायतसाठी पात्र आहे चिचोली ग्रामपंचायत पेक्षा कमी असलेल्या अनेक ग्रामपंचायतीना नगर पंचायत दर्जा देण्यात आला आहे चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायत दर्जा देण्यात आला नाही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आ केदार नगर पंचायतचा विरोध करीत असल्याचा आरोप रिपाई नेते पृथ्वीराज बोरकर यांनी पत्रपरिषदेत केला.

यावेळी नगर पंचायत कृती समितीचे नेते किशोर चौधरी व अशोक मेश्राम यांनी पत्रपरिषदेत चिचोली ग्रामपंचायतला नगर पंचायत दर्जा मिळाल्यास त्यामागचे फायदे व नुकसान समजावून सांगितले याप्रसंगी अशोक मेश्राम यांनी सांगितले की भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विनंती वरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा पॉझिटिव्ह रिमार्क दिला आहे यासंदर्भात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असे असतांना क्षेत्राचे आमदार सुनील केदार नगर पंचायतचा विरोध का करीत आहे हे समजण्या पलीकडे असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रपरिषेदेत अनेकांनी आमदार सुनील केदारांच्या कृतीचा जोरदार विरोध केला असून चिचोली ग्रामपंचायतीला नगर पंचायतीची आवश्यकता का? याची जनजागृती जनतेमध्ये करणार असल्याचे किशोर चोधरी यांनी सांगितले.

खापरखेडा परिसरात नगर पंचायत मुद्दा चांगलाच तापला असून राजकीय नेत्यामध्ये वाकयुद्ध बघायला मिळत आहे येणाऱ्या काळात नगर पंचायत मुद्दा चिघळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहे.

पत्रपरिषदेला पत्रकार दिवाकर घेर, सुनील जालंदर, कपिल वानखेडे, केशव पानतावणे, राजेश खंडारे, विनोद गोडबोले, शैलेश ढोरे, वैभव काकडे, गिरधारी शर्मा आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *