हिंगोली : सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सचिव परमेश्वर इंगोले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हा प्रभारी पदी आज दिनांक 24 मे रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.सदरची ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
परमेश्वर इंगोले हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ते काम करतात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निकटवर्ती असणारे परमेश्वर इंगोले यांनी शरद पवार साहेबांचे विचार सेनगावसह हिंगोली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचविले असून त्याचेच फळ म्हणून त्यांच्या खांद्यावर परभणी जिल्हा प्रभारी पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी सर्वसामान्यांचे तसेच कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.याच कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर वर्णी लागली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर या निवडीबद्दल परमेश्वर इंगोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. प्रतिनिधी महादेव हरण प्रोटला टाका