नांदेड येथे महाराष्ट्र राज्यातील वीरशैव लिंगायत शिवाचार्य ( धर्मगुरू ) यांची दुपारी तब्ब्ल 4 तास बैठक सम्पन्न झाली. त्यात विविध विषयावर चिंतन करण्यात आले. त्यात शिवाचार्य समिती संचालित अधिकमास शिवनाम सप्ताहचे नांदेड येथे 18 जुलै ते 25 जुलै 2023 मध्ये आयोजन करण्याचे एकमताने ठरले.
भारतीय धर्मशास्त्रामध्ये श्रावण मासाला महत्त्व आहे.यावर्षी अधिक मास हा श्रावण मासात आला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात, तेलंगणा आणि कर्नाटक या त्रिवेणी संगमावर असणारे नंदीग्राम (नांदेड) येथे दिनांक 18 जुलै 2023 ते 25 जुलै 2023 पर्यंत शिवनाम सप्ताह संपन्न होत आहे या निमित्ताने
पंचपीठ 5 हि जगद्गुरु, शिवाचार्य,वीरक्त गुरु,आणि संत महंत साहित्यिक मंडळीचे विविध विषयावरती धर्म व समाज प्रबोधन होणार आहे.
संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज कृत “परम रहस्य” ग्रंथ 11000 हजार भक्ताचे पारायण होणार आहॆ.
सिद्धांत शिखामनी” आणि वचन साहित्य अभ्यास सोहळा होणार आहे.
शैक्षणिक, सामाजिक,आणि सर्व पक्षीय राजकीय क्षेत्रातील मान्यवारांचा सन्मान सोहळा व मार्गदर्शन होणार आहॆ.
शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहॆ.
शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या संत साहित्याचे वाचन होणार आहॆ.
समाजाचा आगामी विकासावर चिंतन होणार आहॆ.
या भव्य दिव्य कार्यक्रम सोहळ्याला राज्यातून किमान 2 लाख संख्या अपेक्षित आहॆ. तसेच 5 जगद्गुरू आणि 50 पेक्षा जास्त शिवाचार्य उपस्थिती आहे. यावेळी आपण यावे इतरांनाही सांगावे
यावेळी यां बैठकीला उपस्थित शिवाचार्य
ष. ब्र. 108 डॉ विरूपाक्ष शिवाचार्य (जंगम मठ श्रीक्षेत्र मन्मथ धाम, जिल्हा बीड )
ष. ब्र. 108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज (उदगीर, जिल्हा लातूर )
ष. ब्र.108 सोमलिंग शिवाचार्य महाराज (बिचकुंदा, तेलंगना)
ष. ब्र.108 सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज (बेटमोगरा, जिल्हा नांदेड )
ष.ब्र.108 महादेव शिवाचार्य महाराज (वाई जिल्हा सातारा )
ष. ब्र. 108 दिगांबर शिवाचार्य महाराज (वसमत, जिल्हा हिंगोली )
ष.प्र. 108 काशीनाथ शिवाचार्य महाराज( पाथरी, जिल्हा परभणी )
ष. ब्र. 108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज( हानेगाव, जिल्हा नांदेड )
ष. ब्र. 108 रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड जिल्हा नांदेड )
ष ब्र 108 वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज (मुखेड जिल्हा नांदेड )
ष ब्र 108 गुरूपादेश्वर महाराज (गिरगाव, जिल्हा हिंगोली
ष ब्र. 108बस्वलिंग शिवाचार्य महाराज (कौलास, तेलंगना)
ष. ब्र 108 महादेव शिवाचार्य महाराज (कळमनुरी, जिल्हा हिंगोली)
आणि समाजाचे समर्पित कार्यकर्ता रामदास पाटील सुमठाणकर,एकनाथजी पवार,सुशील घोटे, बस्वराज पाटील, शेम्बळे,इत्यादी उपस्थिती होते.
बैठकीनंन्तर सप्ताह संमेलणासाठी विविध जागेची पाहणी करून भोकर रोडवर विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यलय सर्व शिवाचार्य आणि रामदास पाटील सुमठाणकर, सुशील यांनी भेट देऊन अंतिम केले.
यां भव्य दिव्य सोहळ्या समाजातील
राज्यातील महत्वाचे डॉक्टर,
इंजिनियर,सर्व शासकीय उच्च पदस्त अधिकारी, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, साहित्यिक, प्रवचनकर, कीर्तनकार, व्यापारी, पत्रकार, उद्योगपती इत्यादी सर्व मान्यवर यांना निमंत्रीत केले जाणार आहॆ.
प्रतिनिधी
महादेव हारण