वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विनापरवाना घातक धारदार शस्त्र अवैधपणे बाळगल्याप्रकरणी दोन दिवसांत ०३ आरोपीविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दि.१९.०६.२०२३ रोजी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून ग्राम गिव्हा कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम येथील देविदास सखाराम झोंबाडे, वय ४१ वर्षे याच्या राहत्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार तलवार अं.किं.१४००/-रु. जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीविरुद्ध पो.स्टे.जऊळका येथे त्याचबरोबर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तसेच दि.२०.०६.२०२३ रोजी पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी शस्त्र अधिनियमअन्वये कारवाया करत ग्राम माळेगाव येथून राजू हरिभाऊ वाणी, वय २३ वर्षे याचेकडून ०२ घातक धारदार तलवारी अं.किं.६०००/-रु. पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. तर ग्राम खंडाळा खुर्द, ता.वाशिम येथील गुलाब वसंता भालेराव, वय ३२ वर्षे याचेकडून ०१ घातक धारदार तलवारी अं.किं.२०००/-रु. पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींविरुद्ध पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे त्याचबरोबर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाया मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.विजय जाधव, अजिनाथ मोरे, पोहवा.गजानन अवगळे, पोना.प्रवीण राऊत, राजेश राठोड, राम नागुलकर, प्रवीण शिरसाट, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, अमोल इंगोले, पोकॉ.संतोष शेनकुडे, शुभम चौधरी, विठ्ठल महाले, मपोना.संगीता शिंदे, मपोशि.सुषमा तोडकर, तेजस्विनी खोडके, चापोहवा.रमेश जामकर, चापोशि.संदीप डाखोरे यांनी पार पाडल्या. नागरिकांनी सुजाण नागरिक या नात्याने अवैध शस्त्र धारकांची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL ११२ ला द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206