गरीबांच्या मुखातील घास,धनधांडग्यांच्या घशात
शासकीय धान्य गोडाऊनची तपासणी गरजेचे
सबंधित दोषींवर कठोर कारवाईची होत आहे मागणी
फुलचंद भगत
वाशिम:-काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असलेल्या अंदाजे ५० ते ६० क्विंटल गहु आणी तांदुळ वाशिम पोलीसांनी पकडल्याची माहीती मिळाली असुन सदरचा गहुतांदुळ हा राशनचा आहे का यांची तपासणी आणी शहानिशा करुन सबंधितावर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस सुञाकडुन कळले आहे.गहूतांदुळाचे गोडावूनही सिल केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार वाशिम शहर पो.स्टे.हद्दीत हिंगोली रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ राशनच्या मालासह एक गाडी पोलिसांनी पकडली.सदर गाडीमध्ये साडेअठरा क्विंटल राशनचा गहू शासकीय पोत्यात असल्याचे कळले.सोबतच एका गोडाऊनवरही पोलीसांनी छापा टाकला असता त्या गोडाऊनवरही अंदाजे ५० ते ६० क्विंटल राशनचा गहूतांदुळ असल्याची माहीती मिळाली आहे.गोडावूनमधला गहूतांदुळ हा शासकीय पोत्यात नसल्याचेही कळले.वाशिम जिल्ह्यात धान कुठेही पिकवल्या जात नसल्याने सदर तांदुळ राशनचा आहे का? यासंदर्भात महसूल विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सबंधितावर गुन्हे नोंदवणार असल्याचे कळले.छापा टाकलेल्या गोडावूनला प्रशासनाने सिल केल्याचेही समजते.सदर कारवाई ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.मोहीते आणी ठाणेदार गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनात पिएसआय सचिन गोखले,संदिप वाकुडकर,महादेव भिमटे,ऊमेश चव्हाण यांनी केली आहे.
वाशिम जिल्ह्यात राशनतस्कर पुन्हा सक्रीय
वाशिम जिल्हा हे राशन तस्करीचे हब असल्याचे आतापर्यतच्या महसूल आणी पोलिस प्रशासनाने केलेल्या राशनच्या गहूतांदुळावरील कारवाईमुळे लक्षात येत असुन वाशिम शहरात राशन तस्करावरील मोठ्या कारवाईमुळे राशन तस्कर सक्रीयच आहेत हे अधोरेखीत झाले आहे.गोरगरीबांच्या तोंडचा घास धनधांडग्यांच्या घशात घालणार्या राशन तस्करांचा कठोर कारवाई करुन समूळ ऊच्चाटन करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ शासकीय धान्य गोडावूनची झाडाझडती घेण्याची गरज
वाशिम जिल्ह्यात कुठेही तांदुळ पिकत नाही तरीही शेकडो क्विंटल तांदुळ प्रशासन कारवाई करुन पकडतात.वाशिममधेही केलेल्या कारवाईत पन्नास ते साठ क्विंटल गहूतांडुळ पोलीसांनी पकडला त्यामुळे सदर गहुतांदुळ हा राशनचाच हा संशय बळावत असल्याने वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ शासकीय धान्य गोडावूनची तपासणी करुन झाडाझडती घ्यावी.मालाची तफावत आढळल्यास तात्कास संबधित अधिकारी कर्मचार्यावरही गुन्हे नोंदवावेत अशी मागणी होत आहे.
राशन तस्करीला प्रशासनाचेच पाठबळ असल्याची चर्चा
राशन तस्करीमध्ये काही कारवायामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचार्यांचा सबंध दिसल्याने त्यांच्यावरही कारवाया केल्यात.जिल्ह्यात अजुनही राशन तस्कर सक्रिय असल्याने शेकडो पोते गहुतांदुळांची विक्री काळ्या बाजारात करत असतांनाच्या कारवाया केल्यात.अनेक खाजगी गोडावूनवरही प्रशासनाने छापेमारी करुन तिथुनही राशनचा गहूतांदुळ जप्त केला.यावरुन या राशन तस्करीला प्रशासकीय यंञणेची तर मुकसंमती नाही ना?अशी जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206