मंगरुळपीर:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते.

 या पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विनापरवाना घातक अग्निशस्त्र व धारदार शस्त्र अवैधपणे बाळगल्याप्रकरणी दि.०९.०६.२०२३ रोजी पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.४४८/२३, कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये ०३ आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. सदर प्रकरणात यापूर्वीच १) अभिषेक उर्फ गोलू पवन खळबळकर, वय २८ वर्षे, रा.काळे फैल, वाशिम यांचेकडून एक पिस्टल मॅगझीनसह, २) मकसूद खान मकबूल खान, वय १९ वर्षे, रा.चिपा मोहल्ला, दिल्ली गेट, चितोड, राज्य.राजस्थान याचेकडून एक रिव्हॉलवर व ३) आकाश बबन जाधव, वय २० वर्षे, रा.नागठाणा, ता.जि.वाशिम याचेकडून एक धारदार खंजीर यांना पंचासमक्ष शस्त्रांसह अटक करण्यात आली होती. त्यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सदर आरोपींना शस्त्र पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपी नामे मोहम्मद समीर मंसुरी, वय २२ वर्षे, रा.छिपा मोहल्ला, गुर्जर बस्ती, चित्तोडगड, राज्य.राजस्थान यास चित्तोडगड, राज्य.राजस्थान येथून ताब्यात घेतले असून वि.न्यायालयाने सदर आरोपीस ०४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.जगदीश बांगर, पोहवा.गजानन झगरे, पोना.ज्ञानदेव मात्रे, पोकॉ.निलेश इंगळे, दीपक घुगे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *