वाशिम:-कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मंगरुळपीर ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांनी मंगरूळपीर पोलिस ऊपविगाचा चार्ज हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच गोरगरीबांना भिकेला लावणारा आणी अनेक संसार ऊध्वस्त करणारा मंगरुळपीर तालुक्यातील शिवणीरोड येथील अवैध गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकुन धडाकेबाज कारवाई केली आहे.
दिनांक 21.07.2023 रोजी नीलिमा आरज उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर यांचे पथकाने पोलीस स्टेशन मंगरूळपीर अंतर्गत ग्राम शिवनी रोड येथे दोन ठिकाणी अवैद्य हातभट्टीची दारू गाळणाऱ्या इसमा विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून एकूण 33950/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपी 1. अलीम कासम बेनीवाले रा शिवनी याचे कडून 21250/- व 2. इमाम बेनी बेनीवाले याचे कडून 12700/-रुपयाचा मुद्देमाल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.त्याच शिवणी गावात हायवेरोडलगतच वरली मटका अड्डाही चालवल्या जात असल्याची चर्चा सुरु असुन त्यावरही कारवाई एसडीपिओ निलिमा आरज यांनी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

अवैध गावठी दारू अड्ड्यावरील कारवाई मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर यांचे मार्गदर्शनाखाली Api शिवचरण डोंगरे व पोलीस अंमलदार रवींद्र कातखेडे, मंगेश गादेकर, राम राऊत, विद्या राऊत, रूपाली वाकोडे यांनी कारवाई मध्ये सहभाग नोंदविला.कर्तव्यदक्ष एसडिपिओ अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी धडाकेबाज कारवाया करतील अशी आशा आता जनतेला लागली आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206