चार दिवसांत ०७ कारवायांमध्ये १.९० लाखांचा मुद्देमाल (सडवा मोहा) नष्ट


मंगरुळपीर:-उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर पथक, पो.स्टे.मंगरूळपीर व पो.स्टे.वाशिम ग्रामीणच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दि.१७ जुलै, १८ जुलै, २० जुलै व २१ जुलै, २०२३ या चार दिवसांमध्ये पो.स्टे.मंगरुळपीर व पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील विविध ०७ ठिकाणी धाडी टाकून तब्बल १.९० लाख रुपयांचा गावठी दारू हातभट्टीचा मोहा सडवा नष्ट केला आहे.

 दि.१७ जुलै, २०२३ व दि.१८ जुलै, २०२३ रोजी पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम केकत उमरा शेत शिवारातील ०२ ठिकाणी गावठी दारूभट्टीवर धाड टाकून ७६० लिटर मोह सडवा व २६ लिटर गावठी दारू असा एकूण ८१,२००/- रुपयांची गावठी दारू मोह सडवा जागेवर नष्ट केला. सदर प्रकरणी ग्राम केकत उमरा येथील काशिनाथ वानखेडे व कैलास वानखेडे यांचेवर पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच दि.२० जुलै, २०२३ रोजी पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम काटा शेत शिवारातील गावठी दारू हातभट्टीवर धाड टाकून ४३५ लिटर मोह सडवा व ०६ लिटर गावठी दारू असा एकूण ४४,७०० रुपयांचा मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला असून सदर प्रकरणी सैय्यद अनिस सैय्यद मोती, रा.काटा, ता.जि.वाशिम याचेवर दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.तर उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर पथकाने पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शिवनी रोड येथे ०२ ठिकाणी अवैध हातभट्टीची दारू गाळणाऱ्या इसमांविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून एकूण ३३,९५०/- रुपयांचा मोह सडवा व गावठी दारूचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला असून सदर प्रकरणी अलीम कासम बेनीवाले व इमाम बेनीवाले दोघेही रा.शिवनी रोड यांचेवर दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पो.स्टे.मंगरूळपीर पथकाने ग्राम कोठारी व ग्राम कवठळ येथील गावठी दारू हातभट्टीवर कारवाई करून एकूण २९,७००/- रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. सदर प्रकरणी विशाल प्रकाश गीऱ्हे, रा.कवठळ व बाळू हरिभाऊ मईघने, रा.कोठारी यांचेवर दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.नागरिकांनी अवैध धंद्याविरोधातील माहिती/तक्रार नियंत्रण कक्ष, वाशिम, DIAL 112 यांना द्यावी त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *