वाशिम :- दि.२१.०७.२०२३ रोजी पो.स्टे.शिरपूर येथे अप.क्र.२३३/२३, कलम ३८० भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये ग्राम तिवळी येथील सीताराम महाराज संस्थान व गैबीसाहाब दर्गा येथे तर ग्राम वाघी खुर्द येथील संत श्री.गजानन महाराज संस्थान व हजरत बनेखा दर्गा या चारही ठिकाणीच्या दानपेट्या दि.२०.०७.२३ रोजीच्या रात्री ११.०० वा. ते ०५.०० वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी उचलून नेऊन त्यामधून अंदाजे २५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती.
सदर प्रकरणाचा तपास करत असतांना पो.स्टे.शिरपूरच्या तपास पथकाने CCTV फुटेज व तांत्रिक तपास कौशल्य पणाला लावून प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे १) गुलाब रमेश बंगाळे, रा.किन्ही घोडमोड, ता.मालेगाव, जि.वाशिम व २) एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली. तपासातून निष्पन्न झालेले इतर ०२ साथीदार आरोपी नामे ३) अभिषेक दिनकर अडागळे व ४) अक्षय संपत चक्रनारायण सर्व रा.किन्ही घोडमोड, ता.मालेगाव, जि.वाशिम यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता पो.स्टे.शिरपूर अप.क्र.२०३/२३, कलम ३८०, ५११ भादंवि, पो.स्टे.रिसोड अप.क्र.१८१/२३, कलम ३८० भादंवि व पो.स्टे.वाशिम ग्रामीण अप.क्र.९५/२३, कलम ३७९ भादंवि हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणी पुढील कारवाई व तपास सुरु आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रामेश्वर चव्हाण, पोउपनि.रविंद्र पांडुरंग ताले, सफौ.मोहम्मद शाहीद, पोहवा.धनंजय ठाकरे, राजेंद्र वानखेडे, पोना.गुरुदेव वानखेडे, पोकॉ.गजानन डहाळके, गौरीशंकर तेलंगे, प्रवीण गोपनारायण, शरद कांबळे, विनोद घनवट, ज्ञानबा खिल्लारे यांनी पार पाडली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206