वाशिम :- दि.२५.०७.२०२३ रोजी रात्री पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील ग्राम पारवा येथील मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती. त्यासंदर्भात पो.स्टे.मंगरूळपीर येथे अप.क्र.५२९/२३, कलम ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

      सदर प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रामहरी संदीप लांडकर, वय २८ वर्षे, रा.किनखेडा, ता.मालेगाव, जि.वाशिम यास खामगाव, जि.बुलढाणा येथून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच आरोपीची कसून चौकशी केली असता सदर आरोपीने पो.स्टे.मंगरूळपीर येथे दाखल अप.क्र.८७/२३ कलम ३८० भादंवि व पो.स्टे.जऊळका येथे दाखल अप.क्र.१७८/२३, कलम ३८० भादंवि हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडून त्याने उपरोक्त गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले सोने व वापरलेली मोटारसायकलसह एकूण २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर प्रकरणी पुढील कारवाई व तपास सुरु आहे.

      सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, पोनि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.रमाकांत खंदारे, सपोनि.जगदीश बांगर, पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.गजानन अवगळे, पोना.अमोल इंगोले, पोना.प्रवीण राऊत, पोना.ज्ञानदेव मात्रे, पोकॉ.विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा व पोना.अश्विन जाधव नेमणूक सायबर पोलीस स्टेशन, वाशिम यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *