वाशीम : ( दि. 14 फेब्रुवारी ) देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी वाशीम येथिल धडाडीचे पत्रकार विनोद तायडे यांची निवड करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग चे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन तायडे यांची निवड केली आहे.
विनोद तायडे हे सम्राट टाइम्स या साप्ताहिकाचे मुख्य संपादक – मालक आहेत. ते गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी मेडशी येथून ग्रामीण पत्रकार म्हणून पत्रकारिता सुरू केली. आपल्या लिखाण कौशल्याच्या बळावर त्यांनी,दैनिक लोकसत्ता,दैनिक लोकमत,दैनिक सकाळ,दैनिक पुण्यनगरी,दैनिक दिण्य मराठी,दैनिक मतदार,दैनिक महविदर्भ,दैनिक सम्राट दैनिक महानायक,दैनिक लोकनायक,दैनिक मंगल प्रहर, दैनिक भास्करसह विविध वृत्तपत्रातुन तालुका तसेच जिल्हा पातळीवर पत्रकारिता केली आहे. त्यांच्या सम्राट टाइम्स या वृत्तपत्रातून ते व्रतस्थ पत्रकारिता करीत आहेत.
व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पूप्पाला, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के , यांच्या मार्गदर्शनात साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, कार्याध्यक्ष गजानन धामणे यांच्यासह राज्याचे पदाधिकारी साप्ताहिक विंग ची बांधणी करत आहेत. त्यानुसार राज्य कार्यकारिणी आणि महाराष्ट्रभरातील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती विनोद बोरे हे करत आहेत. विनोद तायडे यांचे पत्रकारितेतील मोलाचे योगदान पाहता त्याच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. मावळते जिल्हाध्यक्ष आणि नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष संदीप पिंपळकर यांनी तायडे
यांच्या पत्रकारीतेतील उत्कृष्ट कार्याचा आढावा प्रदेश कार्यकारिणीला दिला होता. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष बोरे यांनी तायडे यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. या संघटनेच्या माध्यमातून सर्व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधी अन् कर्मचारी एकत्रित येणार आणून साप्ताहिक विंगच्या माध्यमातून शासकिय जाहिरातींची रोस्टरप्रमाणे अंमलबजावणी करणे, अधिस्विकृतीधारक साप्ताहिक संपादकांना विश्रामगृहामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणे, साप्ताहिकाच्या संपादक- पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करणे, म्हाडाच्या घरकूल योजनेच्या आरक्षणामध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकारांना लाभ मिळणे, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीमधून साप्ताहिकाच्या संपादकांना निधी मिळावा, तसेच जिल्हा माहिती कार्यालयामधून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनांची माहिती मिळावी आदी प्रश्न सोडविण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याची प्रतिक्रिया विनोद तायडे यांनी दिली आहे. तायडे यांच्या निवडीचे जिल्ह्यातील साप्ताहिकांच्या संपादकांनी अभिनंदन केले आहे.
