कुंडलवाडी प्रतिनिधी
कुंडलवाडी मुन्वर मस्जिद येथील कार्यरत मौलवीसाहाब हाजी.मोहम्मद नवाब मोहम्मद रहीमसाब यांनी मुन्वर मस्जिद येथे 53 वर्ष सेवा देत नुकतेच वयाचा 90 व्या वर्षी वयोमानानुसार सदिच्छा मौलवी पदाचा राजीनामा दिले.त्याअनुषंगाने शहरातील त्यांचे माजी विध्यार्थ्यांचा वतीने दि.30 जुलै 2023 दुपारी नमाजे जोहर नंतर मुन्वर मस्जिद येथे मोठ्या उत्साहात सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल व जियाओदीन ईरफान सर यांनी हाजी मोहम्मद नवाब मौलवी सहाब यांच्या जिवनाती लोक हितार्थ कार्याचे उपस्थीतांना सविस्तर माहीती दिली.
सर्व प्रथम हाजी मोहम्मद नवाब मौलवी सहाब यांना त्यांच्या विध्यार्थ्यांचा वतीने अंगभर कपडे करीत यथोचित सन्मान करण्यात आले.

एकंदरीत मुन्वर मस्जिद येथे 1971 वर्षा पासुन हाजी.मोहम्मद नवाब सहाब मौलवी सहाब यांनी शहरातील मुस्लीम समाजचा तीनपिढीतील स्त्री,पुरूषांना अरबी,उर्दू विषयाचे ज्ञान देत,मुनवर मस्जिदीत तुटपुंज्या मानधनावर ईमामत पदाची सेवा बजावली.या सोबत एखाद्या परिवारात मुल जन्माला तर त्याचे विधीनुसार नाव ठेवने,विधिनुसार लग्न लावने,
तसेच अंत्यविधीस पुढाकार घेवून विधिनुसार कार्यवाही करणे आदी सेवा त्यांनी निस्वार्थ पणे बजावले हे शहर परिसरातील मुस्लिम समाज बांधवाना ज्ञात आहे.एवडेच नाही तर कोरोणाचा संकट काळात एखाद्याच्या घरात कोणी दगावले तरी हाजी मोहम्मद नवाब मौलवीसाहाब यांनी आपले जिव धोक्यात घालून अंतविधीचे कौतुकास्पद कार्य केले.आद्यापही ते काम त्यांचे अखंडीत चालू आहे.

यासर्व बाबीचा आडावाघेत माजी विध्यार्थ्यांचा वतीने त्यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमास शहर परिसरातील मोठ्याप्रमाणात आजी.माजी विध्यार्थी,मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.