कुंडलवाडी प्रतिनिधी
कुंडलवाडीत गेल्या आठ दिवसापासून सतत पाऊसाची रिमझिम चालूच आहे.दि.21 जुलैचा पाउसाने अनेकांची शेती व घरांचे नुकसान झाले.याबाबत कुंडलवाडीत प्रशासनाचा वतीने सर्वे,पंचनामे करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसे.या बाबत पत्रकार मोहम्मद अफजल तहसिल कार्यालय गाठून नायब तहसीलदार तथा कुंडलवाडी न.प.प्राभारी मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान यांना तोंडी माहिती देताच मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान यांनी तलाठी पवण ठकरोड यांना भ्रमणध्वनीवर आदेशीत केले

की कुंडलवाडी शहरात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादरकरा याकामी नगर परिषद अभियंता सोबत घ्या.कुंडलवाडी शहरातील आपतग्रस्त नारीकांनी तलाठी आपल्या प्रभागात येत असून अतिवृष्टीत
झालेल्या नुकसानीची माहीती देवून प्रशासनास सहकार्य करा असे आवहान मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान यांच्यातर्फे करण्यात आले.

एकंदरीत कुंडलवाडी सज्जा तलाठी पवण ठकरोड गेल्या तीन दिवसापासुन अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे आपतग्रस्तांची भेटघेवून करीत आहे.आद्यापर्यंत शहरातील अंबेकर नगर,साठेनगर,वंजारगल्ली सह प्रभाग एक भोई गल्ली,नरागल्ली येथील एकूण 20 पडझडीचे पंचनामे करण्यात आले.शहरातील बाकी प्रभागात येणा-या काही दिवसात सर्वे करून तहसील कार्यालयात आहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहीती तलाठी पवण ठकरोड यांनी दिली.