माहूर न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर
दिवाणी व फौजदारी न्यायालय व वकील संघ माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर दि.9 ऑगस्ट रोजी माहूर न्यायालयात घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माहूर न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर. पत्की हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहा.सरकारी अभियोक्ता व्ही.डी.चव्हाण, अँड.सि. एम. राठोड, वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. एस. एस. राठोड, सचिव अँड. दिलीप मेहता उपस्थित होते.

यावेळी लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसी वादविवाद हे मध्यस्ती करून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला जातो.सर्वसामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान देने अशी विविध कामे विधी सेवा समितीच्या माध्यमातून केली जातात असे अँड.सी.एम.राठोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी अँड.सी.डी. वाठोरे, अँड.आर.के.कोंडे, अँड.एस. पी.कांबळे, अँड.एस. पी.चांदेकर,अँड.जे.व्ही.अडकीने, अँड.व्ही.एम. चव्हाण,अँड.एन.ए. बनसोडे, अँड. पी.पी.ठेपेकर कार्यालय अधीक्षक वाडीकर, मकरंद गुरव, धुरप्पा भंडारे, सतीश चटलेवार, शेख मुजाहिद,लिपिक रोहित पवार, ढवळे, बेलीफ काळे, खांडरे,शिपाई ढवळे,परेकर आदी सह पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन अँड.यु.व्ही.भवरे यांनी तर आभार अँड.जे.व्ही.अडकीने यांनी मानले.
प्रतिनिधी सचिन जाधव Ntv news मराठी नांदेड