कुंडलवाडी प्रतिनिधी
गणेश उत्सव मध्ये डिजे मुळे ध्वनिप्रदूषण होते, व्यक्तीवर व इतर गोष्टींवर आघात वाईट परिणाम घडतात व गुलाल उधळल्याने डोळ्याची दृष्टी कायमची नष्ट होऊन बसते.गुलाल ऐवजी फुलांचा वापर करा,तसेच डिजेचा खर्च टाळून पारंपरिक वाद्ये वापरा, समाज उपयोगी सुंदर असे देखावे सादर करा येणाऱ्या उत्सवात धर्माबादेत मला विसर्जन दिवशी डिजे व गुलाल मुक्त दिसला पाहिजे असे प्रतिपादन भोकरचे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी धर्माबादेत येथील नगर पलरिषद सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत आवाहन केले.
धर्माबाद येथील नगरपालिका सभागृहात, गोकुळ अष्टमी, पोळा, गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने दि. १ सप्टेंबर रोज शुक्रवारी सायंकाळी ४-३० वाजता शांतता समितीची बैठक भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते, तहसीलदार शंकर हांनदेश्वर, पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे,कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे
सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले, उद्योजक सुबोध काकाणी व धर्माबाद व कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार उपस्थितीत होते. शांतता समिती बैठकीत कुंडलवाडी येथील पत्रकार मोहम्मद अफजल, धर्माबाद येथील जेष्ठ पत्रकार जी.पी मिसाळे, गणेश गिरी, शिवराज गाडीवान,लक्ष्मण तुरेराव,सुदर्शन वाघमारे,भगवान कांबळे,जे.के.जोधंळे,संजय पवार,संजय कदम दत्तात्रय कावडे,आदी
नागरिकांनी अनेक सुचना दिल्या त्यानुसार अप्पर पोलीस अधिक्षकडॉ.खंडेराय धरणे यांनी सखोल मार्गदर्शन करुन सुचना दिले. पुढे धरणे म्हणाले
धर्माबाद हे गाव नांदेड जिल्ह्यात शांतता प्रिय गाव आहे असे एस.पी.साहेबांकडे नोंद आहे. तरीही सर्व गणेश मंडळांनी,आपल्या गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी, जेणेकरून
भविष्यात गणेशमंडळाना सोयीस्कर होईल, स्पीकर,वाहने,सर्व गोष्टींची परवानगी घ्यावी, उत्सवात विविध सामाजिक सुंदर असे देखावे व विधायक,सुसंस्कृत कार्यक्रम घ्यावे, जेणेकरून
समाजात त्याचा फायदा होईल असे म्हणाले या कार्यक्रमास कुंडलवाडी काॅग्रेस शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर,माजी.नगरसेवक शैलेश -याकावार,शेख वहाब,गंगाप्रसाद गंगोणे,सिराज पट्टेदार आदी उपस्थित होते.